
मुंबई : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांचा सोमवारी मुंबईत सत्कार केला. डिसले यांनी ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील विद्यार्थी व शिक्षकांनाही करून द्यावा, अशी अपेक्षा यावेळी ना. मुश्रीफ यांनी व्यक्त केली. यावेळी डिसले यांच्या आई सौ. पार्वती व वडील महादेव यांचाही सन्मान करण्यात आला.
सोलापूर जिल्हा परिषदेतील परितेवाडी ता. माढा येथील प्राथमिक शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनच्या वारकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सात कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या सत्कारावेळी ना. मुश्रीफ म्हणाले, उपक्रमशील असलेल्या डिसले यांनी क्यूआर कोड पुस्तकांच्या माध्यमातून शैक्षणिक विश्वात एक नवी क्रांती घडवून आणली आहे. त्यांच्या या संशोधनाचा व सर्जनशीलतेचा उपयोग जगभरातील शिक्षकांसह विद्यार्थ्यांना होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला