जगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी ; भारत तिसऱ्या स्थानावर

COVID 19 Death - Crematorium

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. जगभरात कोरोना साथीमुळे मृत्यू झालेल्याची संख्या १० लाखांवर पोहचली आहे तर या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३० लाखांहून अधिक झाली. सर्वाधिक बळी अमेरिकेत असून त्यांची संख्या दोन  लाखांहून अधिक आहे. त्यानंतर ब्राझीलमध्ये १ लाख ४१ हजार, भारतात ९५,५४२, मेक्सिकोत ७६,४३०, ब्रिटनमध्ये ४१,९८८ इतकी बळींची संख्या आहे. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले असून काही देशांतील संबंधांमध्येही तणाव निर्माण झाला. सर्वाधिक मृतांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर आहे .

महाराष्ट्रात गेल्या पंधरवड्यापासून दररोज २० ते २५ हजारांदरम्यान नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत असताना सोमवारी हा आकडा ११ हजार ९२१ वर आला आहे. सप्टेंबरच्या अखेरीस कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील जवळपास १० लाख ४९ हजार ९४७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. तर कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३ लाख ५१ हजार १५३ झाली असून दिवसभरात १८० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २ लाख ६५ हजार ३३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू  आहेत. यात सर्वाधिक प्रमाण पुण्यातील रुग्णांचे असून ही संख्या ५७ हजार ३१० इतकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER