औरंगाबादेत वंचितच्या बंद दरम्यान दोन बसच्या काचा फोडल्या

या घटना वगळता शहरात बंदला चांगला प्रतिसाद

Aurangabad

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीने सीएए व एनआरसी विरोधात महाराष्ट्र बंद पुकारला होता. शहरामध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठा शहागंज, औरंगपुरा या भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली. वंचितचे कार्यकर्ते सर्वांना बंदमध्ये सहभागी होण्याचे व व्यापारीपेठ बंद करण्याचे आवाहन करत होते.

धरणांमध्न शेतीसाठी पाणी, आरोग्य योजनाही करणार सुरू

बंदला हिंसक वळण
बंद दरम्यान शहरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास महावीर चौका पुढे एका सिटीबसवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. सोबतच पैठण- औरंगाबाद रोडवर गेवराई येथे एका बसवर अज्ञात लोकांनी दगडफेक केली. यात बसच्या काचा फुटल्या. या घटना वगळता शहरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.