नव्या अवतारातील ग्लॅमरस शहनाज गिल

Shehnaaz Gill

बिग बॉस-१३ (Big Boss 13) मध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेली स्पर्धक म्हणजे शहनाज गिल (Shehnaaz Gill). तिचे सतत रडणे प्रेक्षकांनाच नव्हे तर कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानलाही आवडत नसे. पंजाबची कॅटरीना कैफ म्हणून शहनाज ओळखली जाते. शहनाज लोकप्रिय स्पर्धक होती. बऱ्यापैकी जाड झालेल्या शहनाजने आता आपले वजन कमी केले असून ती आता चांगलीच ग्लॅमरस दिसू लागली आहे.

बिग बॉस संपल्याबरोबर शहनाजकडे कामांची रांग लागली होती. विविध शोसोबतच अनेक जाहिरातींच्या ऑफरही तिला आल्या होत्या. त्यासोबतच सिद्धार्थ शुक्लासोबत तिने एक म्युझिक व्हिडीओही केला होता. या म्युझिक व्हिडीओचे शूटिंग पंजाबमध्ये करण्यात आले होते. भरपूर कामे मिळू लागल्याने शहनाजने आपल्या लूकवर विशेष लक्ष दिले आणि तिने त्यासाठी मेहनत घेतली. बऱ्यापैकी वजनही कमी केले. त्यामुळे तिचे नवे रूप पाहून सगळेच चकित झाले आहेत. या नव्या रूपात ती चांगलीच ग्लॅमरस दिसत आहे. शहनाज इन्स्टाग्रामवर तिचे फोटो नेहमी शेअर करीत असते. या फोटोंवर नजर टाकली असता तिच्यात झालेला बदल स्पष्टपणे दिसून येत आहे.

शहनाजने केवळ वजनच कमी केले असे नाही तर तिने मेकअपची स्टाईलही बदलली आहे. तसेच पंजाबमध्येच काम करणाऱ्या शहनाजने बिग बॉसनंतर मुंबईला आपली कर्मभूमी केले असून ती आता मुंबईला शिफ्ट झाली आहे. त्यामुळेच मुंबईत अनेक वेळा शहनाज दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER