
बहुचर्चित ठरत असलेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या आणि सोयराबाईंची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचे नाव इलाक्षी गुप्ता आहे. विशेष म्हणजे तिने या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. यात ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीच्या, सोयराबाई मोहिते यांच्या भूमिकेत आहे. ‘तान्हाजी’नंतर ती लवकरच मराठी चिपटात पदार्पण करणार अशी चर्चा आहे. याआधी तिने ‘कोल्ड लस्सी आणि चिकन मसाला’ या वेब सीरिजमध्ये काम केले. इलाक्षीने २०१५ साली ‘मिसेस इंडिया ग्लोब’ हा किताब मिळविला होता.