तुमच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे ‘डिटेल्स’ देतो; अण्णांचा शिवसेनेला इशारा

Anna Hazare & Shivsena

अहमदनगर : आमच्यासमोर भाजपा, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. फक्त समाज आणि देश आहे. ज्या वेळी समाज आणि देशासाठी घातक कृत्य होत असते त्यावेळी आम्ही आंदोलन करतो. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसे पाठीशी घातले याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी शिवसेनेला (Shivsena) दिला.

अण्णा हजारे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ३० जानेवारीपासून उपोषण करणार होते. ते उपोषण अण्णांनी मागे घेतल्यानंतर अण्णा भाजपाला पाठीशी घालत आहेत, असे सूचित करताना शिवसेनेने ‘सामना’मधून – अण्णा यांची भूमिका नेमकी काय आहे? असा प्रश्न विचारला आहे.

यावर अण्णांनी, आजचा अग्रलेख लिहिण्याचे कारण काय सांगा? असा शिवसेनेला प्रश्न केला – भाजपा सत्तेवर आल्यानंतर माझी  एकूण सहा आंदोलने झालीत, ते आपण विसरलात का? शिवसेनेला इशारा देताना अण्णा म्हणालेत, तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसे पाठीशी घातले याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER