मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, तुमच्या दारात येऊन सामूहिक आत्मदहन करू!

Uddhav Thackeray.jpg

मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमच्या ठेवीचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दारात येऊन एकत्रित आत्मदहन करू, असा इशारा मैत्रेय फंडमध्ये पैसे गोळा केलेल्या ठेवादारांनी दिला आहे.

एकीकडे कराड जनता सहकारी बँकेचा (Karad Janata Sahakari Bank) बँकिंग परवाना (License Cancelled) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) रद्द केल्यामुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आता मैत्रेय फंड पैसे गोळा केलेल्या ठेवीदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मैत्रेय फंडमध्ये राज्यातील अनेक लोकांनी पैसा गुंतवला होता. पण, संचालकांनी लाखो ठेवीदारांना गंडा घातला. बीड जिल्ह्यातील २५ ते ३० हजार गुंतवणूकदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. जास्ती व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. न्यूज-१८ लोकमतशी बोलत असताना पीडित महिलांनी आपली व्यथा मांडली.

एकट्या बीड शहरात ४० कोटी रुपये गुंतवणूक केली आहे, असे पीडित गुंतवणूकदार महिलांनी सांगितले. यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रपती यांचे फोटो, अभिप्राय, पुरस्कार दाखवून ठेवी गोळा केल्याचे गुंतवणूक करणाऱ्या महिलांनी सांगितले.

लोक दारात येऊन आत्महत्या करण्याच्या धमक्या देत आहेत आणि त्यांचे पैसे द्यायचे आहे, असे म्हणताना अक्षरशः ठेवीदारांच्या डोळ्यात पाणी आले. आतापर्यंत शहरात पैसे बुडाल्यामुळे काही जणांनी आत्महत्यादेखील केली असल्याचेही महिलांनी सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री ठाकरेंनी फडणवीसांचा आणखी एक निर्णय केला रद्द

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER