‘सारथी’ला जे दिलं तेच ‘महाज्योतीला द्या! ओबीसी, व्हिजेएनटी समुहातून होतीये मागणी

Maharashtra Today

बऱ्याच मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर ‘महाज्योती’ जाहिरात निघाली. ‘ओबीसी आणि व्हिजेएनटी’ (OBC, VJNT group)समुहातील विद्यार्थी याची अतुरतेने वाट पाहत होते, महाविकास आघाडीकडून वारंवार महाज्योतीला निधी देण्यात टाळाटाळ करण्यात येत होती. दरम्यान मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या ‘सारथी’ या स्वायत्त संस्थेला अजित पवारांनी सारथीला भरभरुन निधी दिला होता. खासदार संभाजी छत्रपतींनी सारथीसमोर आंदोलन केलं होतं. सारथीला निधी मिळाला पण महाज्योतीला प्रतिक्षाच करावी लागली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी महाज्योतीच्या निधी संबंधी पाठपुरवा केला. यानंतर सरकारनं १५० कोटींचा निधी. ‘बार्टी’, ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’साठी निधी घोषित करण्यात आला. अर्थसंक्लपीय अधिवेशन उलटुन दोन महिने झाल्यानंतर विजय वडेट्टीवारांच्या (Vijay Vadettiwar) मागासर्वगीय खात्यानं महाज्योतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली. विकेंड लॉकडाऊन शनिवार- रविवारसाठी जाहिर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. दोन्ही दिवस कडक लॉकडाऊन आहे. अशा काळात ओबीसी, आणि एनटी समुहातील मुलांचा अपेक्षाभंग करणारी जाहिरात महाज्योतीनं डिक्लेअर केल्याचं विद्यार्थ्यांचं मत आहे.

विद्यार्थी का आहेत संतप्त

मराठा समाजाच्या विकासासाठी सारथी आणि दलित-आदिवासी समाजाच्या विकासाठी बार्टी स्थापन करण्यात आली. त्याच धर्तीवर महाज्योती स्थापन केली असल्याचं वारंवार वडेट्टीवर म्हणत होते. बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर जर महाज्योती स्थापन केली तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या आणि योजना देखील या दोन्ही संस्थेच्या तोडीस तोड द्यायला हव्या होत्या, असं विद्यार्थ्यांचं म्हणनं आहे.

सारथीच्या माध्यमातून ३५० विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी स्कॉलरशीप जाहीर झाली. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आणि एनटीव्हिजेएनटीसाठी मात्र १५० जागांचीच घोषणा करण्यात आली आली आहे. ओबीसींमध्ये एकूण ३४८ जातींचा समावेश होतो. सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी किमान ८०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळायला हवी होती असं विद्यार्थी आणि ओबीसी संघटना आधीपासूनच मागणी करत होत्या.

दुसऱ्या बाजूला बार्टी आणि सारथीच्या तुलनेत संशोधनासाठी मिळणारी शिष्यवृत्ती अत्यंत तोकडी आहे. बार्टी आणि सारथीमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षांसाठी ३० ते ३५ मासिक मिळतात. महोज्योती फक्त प्रतिमाह २० हजार रुपयेच देणार असल्याचं सांगितलंय. मिळणारी रक्कम अत्यल्प असल्यामुळं विद्यार्थी या तरतुदीचा विरोध करत आहेत.

सारथीकडून स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही भरघोस मदत जाहीर झाली आहे. देशभरातल्या प्रतिष्ठीत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक संस्थांमधल्या फीसचा मोठा हिस्सा सारथी भरणार असल्याचं आणि विद्यार्थ्यांच्या रहिवासासाठी मिळून ठरावीक रक्कम प्रतिमाह १२ हजार रुपये देणार असल्याची घोषणा सारथीनं केलीये.

युपीएससीच्या मुख्य परिक्षेला बसणाऱ्या ५२ विद्यार्थ्यांना सारथीनं प्रति उमेदवार ५० हजार रुपयांची स्पॉन्सरशीप घोषित केली आहे. मशिन लर्निंग आणि डेटा सायंटिस्टच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देताना सारथी प्रतिमाह मशिन लर्निंगच्या विद्यार्थ्यांना २० हजार तर डेटा सायन्सच्या विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये प्रति महिना देणार आहे.

तर महाज्योतीनं पीएचडीच्या विद्यार्थ्यांना तुटपुंज्या वीस हजार रुपयाची शिष्यवृत्ती घोषित केलेत. यासाठी मंजूर झालेल्या १५० कोटींच्या निधीपैकी फक्त ३५ कोटी रुपये वापरलेत. यामुळं विद्यार्थ्यांच्यात प्रचंड चीड निर्माण झाल्याचं चित्र आहे.

महाज्योतीची स्थापना

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन करण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री असताना २२ ऑगस्ट २०१९ ला महाज्योती संस्थेची स्थापन केली. माध्यमातून या समाजसमुहांच्या विकासासाठी आता अधिक नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याचं महाज्योतीचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं होतं.

पुण्यात महाज्योतीचं कार्यालय नियोजित होतं पण सत्तांतरानंतर विजय वडेट्टीवारांनी महाज्योतीचं कार्यालय नागपूरला हलवलं. नागपूरला येणं जाणं पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना शक्य नसल्यामुळं उपकेंद्राची पुण्यात स्थापना व्हावी अशी मागणी ही नंतर करण्यात आली. महाज्योती ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे. तिची नोंदणी कंपनी कायद्यानुसार करण्यात आलीये. महाज्योती संस्थेची स्थापन करण्यासह तिच्या कामकाजासंदर्भात वेळोवेळी आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत.

बार्टी म्हणजे काय?

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी १९७८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या नावाची संस्था पुणे येथे स्थापन झाली. या संस्थेस २००८ मध्ये स्वायत्त दर्जा देण्यात आला असून २०१४ पासून तिचा अत्यंत वेगाने विकास झाला आहे. तसेच जून २०१८ मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या नावाची स्वायत्त संस्था स्थापन झाली आहे. या संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मराठा समाजाच्या उत्थानासाठी सारथीची स्थापना

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बहुजनांच्या सामाजिक व शैक्षणिक क्रांती-विकासात छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अमूल्य वाटा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सध्या दोन स्वायत्त संस्था कार्यरत आहेत. त्याप्रमाणेच बहुजन, दुलर्क्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही एक स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्रात ओबीसी आणि व्हिजेएनटींची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत निधी आणि जागा मिळाव्यात ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. येत्या काळात महाजोती या सर्व बाबींवर काय निर्णय घेईल हे बघणं ओत्सुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button