लॉकडाऊन केल्यास जनतेला तीन दिवसांचा वेळ द्या : नीलम गोऱ्हे

Neelam Gorhe

मुंबई :  कोरोनाची (Corona) दुसरी लाट रोखण्यासाठी कमीत कमी १४ दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown) गरज आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटले आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीत सदस्यांनीदेखील १४ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असल्याचे म्हटले आहे. यावर आता शिवसेना (Shiv Sena) नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविले आहे.

गोऱ्हे यांनी पत्रात म्हटले आहे की, “राज्यात लॉकडाऊन करायचा असेल तर जनतेला तयारीसाठी किमान तीन दिवसांचा वेळ द्यावा. जेणेकरून गरजेच्या वस्तू घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळणार नाही आणि लॉकडाऊनचा उद्देशही सफल होईल. तसेच बारा बलुतेदार, ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी राज्य सरकारने सोय करावी. तीन दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये ज्यांना घरी जायचे आहे, त्यांची सोय करावी, त्यांना सूट द्यावी.” अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button