दूध दर रकमेवर फरक द्या : ना. जयंत पाटील

Jayant Patil

सांगली : राजारामबापू दूध संघाने दूध ( milk) उत्पादकांना प्रती लिटर प्रमाणे दूध दर फरक अदा न करता दूध उत्पादकांनी प्राथमिक दूध संस्थाना पुरविलेल्या दूधाच्या रक्कमेवर टक्केवारी नुसार दूध दर फरक अदा करावा, अशी सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले. केंद्राच्या राष्ट्रीय दुग्ध विकास योजनेअंतर्गत बसवलेल्या 85 लाख रुपये किंमतीचा मिल्को स्कॅनचे उद्‌घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते झाले.

मंत्री पाटील यांनी मिल्को स्कॅनचा 100 टक्के वापर करावा. संकलित दुधाची गुणवत्ता 100 टक्के तपासून घ्यावी, अशी सूचना केली.

खासदार माने यांनी मंत्री पाटील यांच्या सर्वच संस्था विकासाभिमुख समाजहितासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी राजारामबापू दूध संघास महासंघाचे संचालक व कार्यकारी संचालक तसेच केंद्रीय पशूसंवर्धन व डेअरी विभागाचे सचिव अतुल चतुर्वेदी, केंद्रीय पशुसंवर्धन व डेअरी विभागाचे जॉईंट रजिस्ट्रार मिहीलकुमार सिंग व उपमन्यु बसू, पशुसंवर्धन व डेअरी विभागाचे सचिव अनुप कुमार यांचे सहकार्य लाभले. मिल्कोस्कॅनमुळे दूधाच्या 28 तपासण्या 30 सेकंदात करता येणे शक्‍य होईल. 14 नैसर्गिक घटकांची तपासणी व भेसळ ओळखता येते, असे सांगितले.

यावेळी राजारामबापू बॅंकेचे अध्यक्ष शामराव पाटील, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, सुस्मिता जाधव, संजय पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती विश्वासराव पाटील आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER