प्रताप सरनाईकांच्या अडचणीत भर ; ईडीला (ED) सापडले पाकिस्तानी क्रेडिट कार्ड; पुन्हा बोलावले चौकशीला!

Pratap Sarnaik - ED Raid

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अंमलबजावणी संचनालय अर्थात ईडीने (Enforcement Directorate (ED) ने पुन्हा एकदा सरनाईक यांना समन्स बजावला आहे. 13 डिसेंबरपासून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

प्रताप सरनाईक यांच्या घरी छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी ईडीला पाकिस्तानी व्यक्तीचे क्रेडिट कार्ड आढलले होते. त्यामुळे ईडीने पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांना समन्स बजावला आहे. ईडीकडून फेअरमाउंट बँक कॅलिफोर्नियाला पत्र लिहिण्यात आले आहे. तसंच पाकिस्तानी क्रेडिट कार्डच्या संदर्भातील स्टेटमेंट मागविण्यात आले आहे. प्रताप सरनाईक यांना 13 तारखेपासून ते 21 डिसेंबरपर्यंत चौकशीला राहण्याचे आदेश दिले आहे.

प्रताप सरनाईक यांची दोन दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. CNN NEWS18 ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने जेव्हा छापा टाकला होता. त्यावेळी एक पाकिस्तानी क्रेडिट कार्ड आढळून आले होते. या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे. पण, हे कार्ड सिंथिया दाद्रस यांच्या नावाने आहे. हे कार्ड फेअरमाउंट, कॅलिफोर्निया (Fairmont Bank, California) इथून देण्यात आले आहे. ईडीने या क्रेडिट कार्डबद्दलची माहिती स्टेटमेंटची मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. तसंच ईडीने फेयरमॉन्ट बँकेकडेही याबद्दल माहिती मागितली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER