क्षत्रियांनाही आरक्षण द्या : रामदास आठवले

Ramdas Athavale

मुंबई :- महाराष्ट्रात मराठा समाज लढत आहे, तसेच हरियाणात जाट, राजस्थानमध्ये राजपूत आणि उत्तरप्रदेशात ठाकूर समाजालाही आरक्षण पाहिजे आहे. या राज्यात मोठ्या प्रमाणात क्षत्रिय आहेत. ज्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्यात आले तसेच त्यांनाही आरक्षण देण्यात यावे. सोबतच २०२१ ची जनगणना जातीच्या आधारे झाली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी संसदेत केली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली. यावेळी न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला की, ८ मार्चपर्यंत प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली नाही तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणी होईल. सुनावणीचा कालावधी निश्चित केला असून ८ ते १८ मार्चपर्यंत ही सुनावणी पार पडणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER