
मुंबई : सध्या भारतात कोरोनाच्या लसीवर (Corona vaccine) मोठे प्रयत्न केले जात आहे. लवकरच कोरोनावरलस येण्याचा दावाही केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाची लस आल्यानंतर ती सुरुवातीला डॉक्टर, पोलिस आणि कोरोना सेवकांनाच दिली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केली आहे. त्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी डॉक्टर, पोलिसांसह लष्करातील जवान आणि माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचं अग्रक्रमाने लसीकरण करण्यात यावं अशी मागणी केली आहे.
कोरोनाची लस आल्यानंतर प्रथम श्रेणीत ती लोकप्रतिनिधींनाही देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे, की कोरोनाची लस ही सुरुवातीला फक्त डॉक्टर, पोलिस आणि कोरोना सेवकांनाच दिली जाईल. त्यात लष्करी जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या परिवाराचाही प्रथम श्रेणीत समावेश करुन, त्यांनाही कोरोनाची लस दिली जावी अशी मागणी बाळा नांदगावकर यांच्याकडून करण्यात आली आहे. हे सर्वच देशासाठी बलिदान देण्यात अग्रेसर असतात असं नांदगावकर म्हणाले.
कोरोनाची लस आल्यावर ती डॉक्टर, पोलीस व इतर आरोग्य सेवकांना प्रथम देण्यात येणार असे काल आरोग्य मंत्री बोलले, परंतु या बरोबरच सर्व सैनिक , माजी सैनिक व त्यांच्या परिवारा ला अग्रक्रमाने लसीकरण करण्यात यावे कारण हे सर्वच देशासाठी बलिदान देण्यात अग्रेसर असतात.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) December 2, 2020
ही बातमी पण वाचा : कोरोनावरील लस आली; पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये लसीकरण
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला