देश पुन्हा एकदा ६ महिन्यांसाठी डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या’ : दत्तू गवाणकर

मुंबई :- देशात कोरोना (Corona) महामारीचे संकट उभारले आहे. आता परदेशी प्रसार माध्यमांनीही मोदी सरकारवर (Modi Govt) टीका-टिप्पणी करायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षही सातत्याने मोदी सरकार आणि आरोग्य मंत्र्यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्न उभे करत आहे. अनेकदा केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. मद्रास उच्च न्यायालयानेही केंद्राला फटकारले होते. तर, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेही १२ सदस्यांच्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे.

केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरले, असा ठपका मोदी सरकावर लावण्यात आला आहे. सोशल मीडियातूनही केंद्रावर टीकास्त्र सोडले जात आहे. काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ता दत्तू गवाणकर यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. “देश फक्त ६ महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांच्या हाती द्या, मग बघा कशी सर्व स्थिती नियंत्रणात येईल. सुशिक्षित आणि अनपढ़ याच्या मधला फरक सुद्धा लक्षात येईल, असेही दत्तू गवाणकर (Dattu Gawankar) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : किमान सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाउन हवा; ICMRचे प्रमुख बलराम भार्गवांचे मत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button