दारू विक्रेत्यांना पोलीस संरक्षण द्या

दारू विक्रेते स्टेट एक्साईजकडे मागणी

Give police protection to liquor dealers

औरंगाबाद : शहरात १ जून पासून होम डिलिव्हरीच्या माध्यमातून दारू विक्री करण्यात येत आहे. हे करताना विक्रेत्यांना अनेक अडचणी येत असून दुकानासमोर गर्दी ही होत आहे. यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्या अशी मागणी दारू विक्रेत्यांतर्फे मंगळवारी(ता.२) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे (स्टेट एक्साईज) करण्यात येत आहे.

अनेक जण ऑनलाइन असताना ही त्रास देत आहे काहीजण दादागिरीची भाषा करत असल्यामुळे आम्हाला दारू विक्री करताना अडचणी येत असल्याचे विक्रेत्यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांकडे आपल्या तक्रारीचा पाढा वाचून दाखवला. आपल्या माध्यमातून पोलीस संरक्षण मिळवून देण्यात यावे अशी मागणीही या विक्रेत्यांतर्फे करण्यात आली.

आम्ही सर्व नियम पाळतो आहेत. नियमानुसार सर्व क्रमांकही दुकानाच्या बाहेर लावण्यात आले आहेत. ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनाच ऑनलाईन ऑर्डर प्रमाणे दारू होम डिलिव्हरी देत आहोत. असे असले तरी अनेक जण आम्हाला त्रास देत आहेत. यासह दिवसभरातून 10 डिलिव्हरीच्या वर ऑर्डर जात नसल्याने ही अडचण येत आहे.

आज शहरातील परवानाधारक मद्य विक्रेते आम्हाला भेटायला आले होते. त्यांनी मद्य विक्री करताना पोलिस संरक्षण देण्याची मागणी आमच्याकडे केली. त्यांच्या मागणीनुसार आम्ही एक पत्र तयार करून ते या विक्रेत्यांच्या माध्यमातून पोलिस आयुक्तालयात देणार आहोत.

-एस. एल.कदम, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER