‘मोदी जी एक मुख्यमंत्री भी महाराष्ट्र को भी दे दो’, रिट्विट करत नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

Maharashtra Today

मुंबई : साध्य कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाच्या वाढत असलेल्या रूग्णसंख्येमुळे राज्यात औषधी, ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, त्यासाठी रूग्णांना वणवण भटकावे लागत आहे.

राज्यात निर्माण झालेली परिस्थिती बघता मुख्यंमत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी केंद्राकडे औषधी, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारकडून केंद्राकडे सतत मागणी होत असल्याने विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. याच मुद्द्यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक रिट्विट करत ‘मोदी जी एक मुख्यमंत्री भी महाराष्ट्र को दे दो’ म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button