‘पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा द्या’, रामदास आठवलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Ramdas Athawale - CM Uddhav Thackeray

मुंबई :- कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार वृत्तांकन करून जनतेपर्यंत महत्वाची माहिती पोहोचवत असतात. लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना (Journalist) महाराष्ट्र सरकारने कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स (COVID Frontline Warriors) कोरोना योद्ध्याचा दर्जा द्यावा अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रकारांना कोविड फ्रंटलाईन वॉरीयर्स अर्थात कोरोना योद्धाचा दर्जा पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार या राज्यांनी दिला आहे. महाराष्ट्राला महनीय पत्रकारांची परंपरा लाभली आहे. ज्यांनी अखिल भारताचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र राज्य नेहमी पत्रकारांचा सन्मान करणारे राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून पत्रकारांच्या बाबतीत उपेक्षेचे धोरण दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये पत्रकारांचा समावेश केलेला नाही. परिणामी पत्रकार आणि कॅमेरामन फोटोग्राफर यांना रेल्वे प्रवास करता येत नाही. अन्य राज्यांत पत्रकारांना कोरोना फ्रंटलाईन वारॉयर्सचा दर्जा दिला असताना महाराष्ट्रात पत्रकारांना रेल्वे प्रवासाची अत्यावश्यक सेवेत नोंद घेतली जात नाही, ही खेदजनक बाब आहे.

ही बातमी पण वाचा : ‘फक्त तोंडाची वाफ, काय कर्तृत्ववान मुख्यमंत्री लाभला या महाराष्ट्राला’; भाजपचा टोला

पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने करू नये. राज्यातील पत्रकारांना कोरोना योध्याचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान राखावा. महाराष्ट्रात कोरोनाच्या (Maharashtra Corona) या संकट काळात १२४ पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने सांत्वनपर मदत केली पाहिजे. पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा (Corona Warrior) दर्जा देऊन त्यांना लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे तसेच कोरोनामुळे पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला सांत्वनपर ५० लाख रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button