कोरोना योद्धांच्या पगारात कपात न करता प्रोत्साहन भत्ता द्या, गिरीश महाजन यांची मागणी

Girish Mahajan

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, राज्य सरकारसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना एक किंवा दोन दिवसाचा पगार मुखयमंत्री सहायता निधीत देण्याचे आवाहन केले आहे. मात्र सरकारच्या या आवाहनाला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

एकीकडे आरोग्य, पोलीस कर्मचारी जीवाची पर्वा न करता कोरोनाशी दोन हात करत सेवा देत आहे. त्यांना आता सुरक्षेसह सुविधा देण्याची गरज आहे. मात्र त्यांच्या वेतनात कपात केली जात असेल तर ते योग्य नाही. वास्तविक पाहता त्यांच्या पगारात कपात न करता उलट प्रोत्साहन भत्ता द्यायला हवा अशी मागणी महाजन यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER