उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये जादा दर द्या : शेतकरी संघटनेची मागणी

Farmers Association Kolhapur

कोल्हापूर :- कोल्हापूर, सांगली जिल्हातील साखर उतारा गुजरातच्या गणदेवी कारखान्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे येथील कारखान्यांकडे गणदवीपेक्षा जादा दर देण्याची कुवत आहे. या कारखान्याचा 12.50 उतार्याला चार हजार रुपये दर आहे. त्यानुसार कोल्हापूर (Kolhapur) विभागातील कारखान्यांनी अंतिम दर द्यावा. त्यापूर्वी पहिली उचल एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळावेत अशी मागणी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन प्रादेशीक साखर सहसंचालक सदाशिवराव जाधव यांना दिले आहे.

जिल्हातील कारखान्यांची परिस्थिती चांगली असूनही दर दिला जात नाही. शेतकर्यांना लुटले जात आहे. शेतकर्यांना दर द्यायचा म्हटले की उसाचे बंपर उत्पादन, अतिरिक्त साखरचे अवाई उठवली जाते . या सर्व अडचणीवर मात करुन अन्य राज्यातील कारखाने दर देतात ते कोल्हापूर विभागातील कारखान्यांना का शक्य नाही? अशी विचारणा निवेदनातून केली आहे. पहिली उचल एफआरपी अधिक दोनशेवर आम्ही ठाम आहोत. याबाबत कारखानादारांना आदेश काढावेत, इथेनॉल उत्पादनाचा विचार केला तर टनाला चार हजार देणे शक्य आहे. तरी जिल्हाधिकार्यांसमवेत तातडीने बैठक बोलावण्यात यावी, असे ही निवेदनात म्हटले आहे. ऍड. माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात टी. आर. पाटील, राजू खुर्दाळे, बाबासाहेब मिरजे, गोरख चंदणशिवे, धनाजी चौगले, बाबासाहेब गोसावी आदींचा उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER