मुंबईकरांना मोफत लस द्या; गणेश नाईकांची मनपाकडे मागणी

Ganesh Naik

नवी मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्ण वाढल्याने लसीचीही मागणी वाढली आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी मुंबईकरांना कोरोनाची लस मोफत द्या, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. याबाबत अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

क्रिस्टल हाऊस येथे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केले. यावेळी गणेश नाईक यांनी ही मागणी केली. शिवसेना उपविभागप्रमुख मनोज शिंदे, शाखाप्रमुख सागर शिंगाडे, माजी उपविभागप्रमुख शंकर पाटील, आनंद पवार, उपविभाग संघटक मीनाताई पाटील, अखलाक शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे राहुल कश्यप यांनी नवी मुंबई भाजपा निवडणूक प्रभारी आमदार आशिष शेलार आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह संजय उपाध्याय, असे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोना लसीसाठी १५० कोटींची तरतूद करा
कोरोना लस आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आर्थिकदृष्ट्या विचार करून सामान्य नागरिकांना लस कशी उपलब्ध करून देणार, याबाबत निर्णय घेतील. सरकारने ही लस सर्वसामान्यांना मोफत उपलब्ध करून न दिल्यास मनपाने मुंबईतील सुमारे १५ लाख नागरिकांना लस मोफत उपलब्ध करून द्यावी. यासाठी बजेटमध्ये १५० कोटींची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी मनपा आयुक्ताकडे केली आहे. “मोफत लस मिळावी हीच आमची भूमिका आहे.” असे नाईक यांनी सांगितले.

आघाडीच्या पराभवाची सुरुवात नवी मुंबईतून होईल
महाराष्ट्र विकास आघाडीचा पराभव नवी मुंबईपासून सुरू होईल, असा अंदाज आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे शहर देशातील ‘नंबर वन’ स्वच्छ शहर झाले. भाजपाला या शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करायचे आहे. नवी मुंबईतील जनता भाजपालाच विजयी करेल, असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER