सर्वांना निःशुल्क लस द्या, मागणीसाठी भाजपाची महापौर दालनासमोर निदर्शने

Demand For Free Vaccination

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लस (Coronavirus Vaccine) सर्वांना निःशुल्क द्या, या मागणीसाठी मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनासमोर निदर्शने केली. मुंबईत मागील चार दिवसांपासून लसीकरण केंद्र बंद आहेत. लसीकरण केंद्र सुरू करा आणि सर्वांना निःशुल्क लस द्या, अशा घोषणा निदर्शक देत होते.

ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

मुंबईत कोरोना रुग्णांची (Corona) संख्या सातत वाढते आहे. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी व्यापक लसीकरण आवश्यक आहे. गेले तीन दिवस पालिकेने लसीकरण केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला – दुसरा डोस मिळणार नाही, असे घोषित केले आहे. याआधीही आठवडाभर लसींची कमतरता असल्यामुळे सर्व खाजगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण पुर्णत: थांबवले होते. त्यामुळे गेले १० दिवस शासकीय केंद्रांवर लसीकरणासाठी प्रचंड गर्दी उसळली आहे. यात वरिष्ठ नागरिकांना मुख्यत्वे ८० वर्षांवरील अतिवरिष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.

लसीकरण केंद्रावरील गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे यामुळे लसीकरणाच्या प्राथमिक उद्दिष्टास हरताळ फासला जातो आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महापालिकेकडून तातडीने सर्वांना निःशुल्क लसीकरण करून मुंबईकरांचे प्राण वाचवण्याची मागणी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

प्रभाकर शिंदे, पक्षनेते विनोद मिश्रा, प्रभारी भालचंद्र शिरसाट, उपनेते अभिजित सामंत, रिटा मकवाना, उज्वला मोडक, अतुल शाह, शितल गंभीर – देसाई, राजेश्री शिरवडकर, ज्योती अळवणी, नेहल शाह, प्रकाश गंगाधरे, जगदीश ओझा, साक्षी दळवी, जागृती पाटील, महादेव शिवगण, हरिष भांदिर्गे अनिष मकवानी, पंकज यादव, जितेंद्र पटेल आणि इतर भाजपा नगरसेवक उपस्थित होते.

मागण्या!

  • सर्व मुंबईकरांचे निःशुल्क लसीकरण करा
  • ४५ वर्षांवरील ज्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे, त्यांची स्वतंत्र रांग लसीकरण केंद्रांवर लावण्याची व्यवस्था करा
  • अतिवरिष्ठ (८० वर्षांवरील) नागरिकांसाठी वेगळी रांग ठेवा
  • ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस घ्यायचा असेल, तर नोंदणीनंतर ‘वॉक इन’ लसीकरण न करता कालबद्ध पूर्व नियोजित वेळेनुसारच लसीकरण करा
  • १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे नोंदणी नंतर आगाऊ निश्चित केलेल्या वेळेनुसारच लसीकरण करण्यात यावे
  • मुंबईकरांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी लसीचा पुरेसा साठा प्रत्येक लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करा
  • सर्व लसीकरण केंद्र किमान १२ तास आणि आवश्यक असेल, शक्य असेल तिथे २४ तास सुरू ठेवा. लसीकरणाची प्रक्रिया आगाऊ निश्चित केलेल्या वेळेनुसारच करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button