कोरोना लस मोफत द्या; ममतादीदींची पंतप्रधान मोदींकडे मागणी; केंद्राला सहकार्याचे आश्वासन

mamta Banerjee - PM Modi - Maharashtra Today

कोलकाता : ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर बॅनर्जी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. ममता बॅनर्जींना पंतप्रधान मोदींनी ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यावर ममता बॅनर्जी यांनीही मोदींचे आभार मानले. सोबतच कोरोना संकटाच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार सोबत मिळून काम करतील, असा विश्वासही त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जींनी सर्वांना लस मोफत देण्याची मागणी केली आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “शुभेच्छा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार. पश्चिम बंगालचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. मी केंद्राला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देते आणि एकत्र मिळून कोरोना महामारीचा सामना करू. तसेच, राज्य आणि केंद्राच्या सहकार्याचा एक आदर्श निर्माण करू.”

RT-PCR चाचणी अनिवार्य
ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी थेट राज्य सचिवालयात अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थितीबाबत बैठक घेतली. बंगालची सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी काही महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत. पश्चिम बंगालमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू असणार आहे. त्याचबरोबर लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. इतकेच नाही तर अन्य राज्यातून बंगालमध्ये प्रवेश करणाऱ्यांना RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणे अनिवार्य आहे. हे निर्णय ७ मेपासून लागू असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button