
मुंबई : देशात कोरोनाने थैमान घातले आहे . कोरोनाची लस आता येत आहे. केरळ, मध्यप्रदेश, आसाम, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही मोफत कोरोना लस देणार आहोत. महाराष्ट्रातील जनतेलादेखील कोरोना लस मोफत मिळावी, अशी आमची मागणी असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) तसा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांनी केली आहे.
नगर जिल्हा भाजपच्यावतीने आज आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आपले पालकमंत्री कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे तेथे हत्तीचा प्रश्न आहे. हत्तीच्या प्रश्नापुढे बिबट्याचा प्रश्न सोडवणे अवघड नाही. परंतु तो सोडवण्यासाठी त्यांची मानसिकता नाही. योग्य तो आदेश वन विभागाला ते देत नाहीत.
त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतीच्या कामासाठी शेतात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. हसन मुश्रीफ यांनी हत्ती पकडण्याचे, हत्ती पळून लावण्याचे त्यांचे कौशल्य हे बिबट्याच्या संदर्भात जिल्ह्यात लावले, तर जिल्ह्यातील शेतकरी सुखी व समाधानी होतील. शेतकरी भयभीत राहणार नाहीत, असेही प्रा.शिंदे म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला