आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला सवलती द्या : खा. उदयनराजे

Udayan Raje Bhosle

सातारा : मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत, विविध सवलती आणि योजना लागू कराव्या. त्यामुळे मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल. खास करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत, शिष्यवृत्ती, हॉस्टेलची सुविधा, नामांकित शाळांत गरीब आणि दुर्गम भागातील मराठा मुलांना खासबाब म्हणून प्रवेश देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी सरकारकडे केली आहे.

खा. उदयनराजे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावी. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या मराठा विद्यार्थ्यांना स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना लागू करा. गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळांत प्रवेश मिळावा, ग्रामीण भागातील बेघर मराठा कुटुंबांना घरे मिळावीत.

सारथी संस्था सक्षम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात एक हजार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी सवलती सारथीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्या. मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेसह इतर परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू कराव्या, असेही खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER