राजश्री शाहू महाराज यांना भारतरत्न द्या : मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी

Give Bharat Ratna to Rajshree Shahu Maharaj

मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना “भारतरत्न” हा सर्वोच्च सन्मान द्यावा, यासंदर्भात केंद्र शासनाकडे राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे ठराव करून पाठवावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे डॉ.एन.डी.पाटील यांनी केली. यावेळी मंत्री जयंत पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

दहा वर्षांपूर्वी संसदेच्या प्रांगणात शाहू महाराज यांचा पुतळा बसवला. कोल्हापूर संस्थानमध्ये शाहू महाराज यांनी समाजातील तळागाळातील बहुजन वर्गास सामाजिक उन्नती प्रदान करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. शंभर वर्षांपूर्वी आरक्षण दिले.

प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. सर्व धर्मियांना शिक्षणाची द्वारे खुली व्हावीत यासाठी मोठ्या प्रमाणात वसतिगृहांची निर्मिती केली. शाहू महाराज यांनी कोल्हापुरात केलेल्या कार्याची दखल आणि कृती नंतर जगाने केली. शाहू महाराज यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा अशी मागणी राज्य शासनाने करावी, असे डॉ. पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले.

‘सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा’, अजित पवारांचे आवाहन