मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या; वरिष्ठ पत्रकाराची मागणी

Manmohan Singh - Sagarika Ghose

दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ (Bharat Ratna) द्या, अशी मागणी वरिष्ठ पत्रकार सागरिका घोष (Sagarika Ghose) यांनी केली आहे. मनमोहन सिंग यांनी देशातील सुमारे २७ कोटी जनतेला दारिद्र्य रेषेतून बाहेर काढले त्यामुळे ते या पुरस्काराचे दावेदार ठरतात असे, घोष म्हणाल्या.

मनमोहन सिंग सन १९९१ मध्ये अर्थमंत्री झाल्यानंतर अनेक बदल घडवून आणले. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पाठिंब्याने त्यांनी दशकांपासून नियंत्रित असलेली अर्थव्यवस्था मुक्त केली. २००६ ते २०१६ दरम्यान २७१ मिलियन म्हणजेच २७.१ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर काढले. या अवधित बराच काळ मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते, हे घोष लक्षात आणून दिले.

भारतातील करोडो लोकांना दारिद्र्य रेषेतून वर काढल्याची आकडेवारी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केली आहे. आत्ताच्या गरिबांसाठीच्या अनेक योजना – वित्तीय समावेशन, मनरेगा आणि आधार कार्ड त्यांच्याच कार्यकाळातील आहेत, असे घोष यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

भारतात अर्थमंत्र्यांवर नेहमी काही उद्योग घराण्यांच्या जवळ असल्याचा आरोप होत राहिला आहे. मात्र, मनमोहन सिंग यांच्यावर कधीही जातीयवाद किंवा कोणत्याही विशिष्ट व्यावसायिक कुटुंबांशी संबंध असल्याचा आरोप झाला नाही. भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील मंत्र्यांवर टीका झाली पण, त्यांच्यावर कधीही वैयक्तिक भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. सिंग यांनी ज्या प्रकारे आपल्या कुटुंबाला राजकीय जीवनापासून दूर ठेवले तो राजकीय क्षेत्रासाठी एक आदर्श आहे, असे त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER