‘कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न पुरस्कार द्या’, जयंत पाटील यांची मोदींकडे मागणी

Jayant Patil - pm modi - Maharashtra Today

मुंबई : कर्मवीर भाऊराव पाटील (Bhaurao Patil) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुसऱ्यांदा केली आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी तीन वर्षांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी उचलून धरली होती. आज भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्ताने पाटील यांनी मोदींना पुन्हा या मागणीची आठवण करून दिली आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली. सोबत त्यांनी तीन वर्षांपूर्वी म्हणजे ९ मे २०१८ रोजी मोदींना लिहिलेल्या पत्राची प्रत जोडली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजनांना शिक्षणाकडे वळवले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या शिक्षणासाठी समर्पित केले म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी तीन वर्षापूर्वी केली होती. आज पुन्हा एकदा मोदींकडे ही मागणी करत आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

माझ्या दाढीत जितके केस आहेत तितके बहुजन शिक्षित करेन असा संकल्पच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि अखंड ज्ञानदानाचा कार्यक्रम हाती घेतला. रयत शिक्षण संस्था नावाचा वटवृक्ष आजही तसाच उभा आहे आणि गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देत आहे, याकडेही पाटील यांनी मोदींचं लक्ष वेधलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button