‘आमचे पाच नगरसेवक परत द्या’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अजित दादांना निरोप

अहमदनगर : ४ जुलै रोजी पारनेर तालुक्यातील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केल्याने शिवसेना अस्वस्थ झाल्याची माहिती पुढे आली आहे. अशातच, पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून अजित पवारांना पाठवला असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा निरोप शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोन करून अजित पवार यांच्यामार्फत पोहोचवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पारनेर नगरपंचायतीतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंनी मनावर घेतल्याची माहिती पुढे आली आहे. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेतुन राष्ट्रवादीत गेलेल्या नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER