एकरकमी एफआरपी देवू : कारखानदार १४ टक्के वाढीव मागणीवर संघटना ठाम

Kolhapur .jpg

कोल्हापूर : शुगर ॲक्टनुसार ऊसाची एकरमी एफआरपी देण्यास साखर कारखानदार बांधील आहेत. त्यानुसार ती देवू, असे ठोस आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी साखर कारखादारांच्यावतीने दिले. तर ओढणी तोडणीसाठी १४ टक्के वाढीव देवू केलेली वाढीव रक्कम कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावी या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम राहिली. सोमवारी (दि.२) होणाऱ्या ऊस परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्याच्या अध्यक्षांची बैठक झाली. याबैठकीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीन टप्प्यात एफआरपीबाबत कारखान्यांनी घेतलेले करार रद्द करावेत, ऊस तोडणी मजूरांना दरवाढ देण्यास संघटनेचा विरोध नाही. १४ टक्के मान्य केलेली दरवाढ शेतकऱ्यांच्या एफआरपीमधूनच वजा केली जाणार आहे. ही दरवाढ कारखान्यांनी एफआरपी सोबत द्यावी अशी मागणी केली.

एकरकमी एफआरपी देण्याबाबत कारखाने बांधील आहेत. त्यानुसार ती दिली जाईल.साखरेचे दर वाढीव मिळाल्यास शेतकऱ्यांना दर देणे सोपे होईल. कारखानदार आणि संघटना दोन्ही मिळून साखरेच्या दरवाढीसाठी एकत्र आंदोलन करु. शेतकऱ्यांचे नुकसान करण्याची भावना कारखानदारांची नाही. संघर्ष टळून यंदाचा हंगाम शांततेत व्हावा असे आवाहन सतेज पाटील यांनी केले. यावेळी आमदार पी. एन.पाटील, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार चंद्रदीप नरके, आदींसह कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER