पाकिस्तानला द्या सडेतोड उत्तर! लष्कर प्रमुखांनी दिले आदेश

श्रीनगर : पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश भारताचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी दिले आहेत. शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करीत जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागात पाकिस्तानकडून सतत गोळीबार करण्यात येत आहे, हे येथे उल्लेखनीय.

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत स्वरांगिनी वडेर ला सुवर्ण पदक

जनरल नरवणे यांनी आज मंगळवारी काश्मीरचा दौरा करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. नगरोटा येथे त्यांनी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. पाकिस्तानकडून होणार्‍या गोळीबाराला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश त्यांनी या बैठकीत अधिकार्‍यांना दिलेत. दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तळ उभारले असून, ते भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती, लेफ्टनंट जनरल कंवलजीतसिंग ढिल्लन यांनी दिली आहे.