महाराष्ट्राला रोज ५० हजार रेमडेसिवीर द्या, अन्यथा मोठे संकट उभे होईल; मलिकांची मागणी

Maharashtra Today

मुंबई : जगातील कोरोनाच्या(Corona) दैनंदिन रुग्णसंख्येने भारताने उच्चांक गाठला आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोना (Maharashtra Corona) रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या देशात सर्वांत जास्त वाढली आहे. राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना ऑक्सिजन तसंच रेमडेसिवीरचा तुटवडा मोठी चिंतेची बाब ठरली आहे. या दरम्यान केंद्र सरकारने राज्यांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वाटपासंबंधीची माहिती जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राला दररोज २६ हजार रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी नाराजी जाहीर केली आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट करत केंद्राकडे मागणी केली आहे. राज्याला दररोज ५० हजार रेमडेसिवीर ( 50,000 remedivir) दिले जावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा राज्यात मोठे संकट उभे होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, ‘केंद्र सरकारने नुकतंच राज्यांना होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपासंबंधी माहिती जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकार आधीपासून मागणी करत असल्याप्रमाणे दिवसाला ५० हजार इंजेक्शनची गरज आहे. आतापर्यंत आम्हाला दिवसाला ३६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत आहेत. नव्या वाटपानुसार, महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार इंजेक्शन्स मिळणार आहेत. यामुळे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यात मोठं संकट निर्माण होऊ शकतं. केंद्र सरकारने आम्हाला दिवसाला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देत महाराष्ट्राच्या नागरिकांच्या गरजा पूर्ण कराव्यात.’ अशी मागणी त्यांनी पुढे केली आहे.

ही बातमी पण वाचा : आता कोविशिल्ड लस सरकारी रुग्णालयात ४०० तर खाजगी रुग्णालयात ६०० रुपयांना मिळणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button