संसद आणि विधानसभेत महिलांना 50 टक्के आरक्षण द्या; शिवसेना नेत्याची मागणी

Priyanka Chaturvedi

नवी दिल्ली :- शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी महिलांना संसद आणि विधानसभेत 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी केली आहे. राज्यसभेत महिला दिनानिमित्त (International Women’s Day) विशेष चर्चेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली.

24 वर्षांपूर्वी आम्ही महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव आणला होता. मात्र, आता महिलांची लोकसंख्या 50 टक्के झाली आहे. त्यामुळे महिलांना संसद आणि विधानसभेत 50 टक्के आरक्षण देण्यात यावे, असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या. कोविडच्या काळात त्याचा सर्वाधिक परिणाम महिलांवर झाला आहे. त्यामुळे संसदेत या सर्व विषयांचा गंभीरपणे विचार करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER