सौरउर्जेतून शेतकऱ्यांना आत्मनिर्मभर करणारा ‘गीताराम’!

'Gitaram' to make farmers self-sufficient through solar energy!

गरज ही अविष्काराची जननी असल्याचं आपण नेहमी ऐकतो. पण या उक्तीला वास्तवात उतवलंय पुण्याच्या न्हावरे गावच्या ४९ वर्षीय गीताराम कदम (Gitaram Kadam) यांनी. गीताराम कदम यांच्या गावात विजेची भीषण समस्या होती. गावात रात्री ११ ते सकाळी ७ पर्यंतच वीज असायची. ७५००ची लोकसंख्या असलेल्या या गावात शेती करणं जवळपास अशक्य गोष्ट होती. पण व्यवसायानं इंजिनिअर असणाऱ्या गीताराम यांनी या आव्हानाला तोंड देण्याचा निर्णय घेतला. आणि एका अभिनव उपायानं या समस्येवर मात केली.

शेतकऱ्यांची दुर्दशा

जैविक शेती करण्याच्या उद्देश्याने २०१६ ला गीताराम कदम यांनी १२ एकर जमिन विकत घेतली. पण विजेच्या दुरावस्थेने त्यांचे हे स्वप्न भंग झालं. ८ तास वीज देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. २३० व्होल्टची सिंगल फिज वीज देण्यात आली होती. दुसरी फिज १०५ व्होल्टची होती. यामुळं मोटर पंपच मोठं नुकसान व्हायचं.

अमेरिकेतल्या पवन चक्की कंपनीचे प्रोजेक्ट हेड पदाचा अनुभव असणारे गीताराम यांना वेगवेगळे अनुभव येत होते. शेतकरी रात्रभर जागून पिकाला कसं पाणी देत असतील? याबद्दल ते नेहमी विचार करायचे. शेतीतील या दुविधांमुळं बहुतांश युवावर्ग शहरात स्थलांतरीत होऊ लागला. या भागात मेथी, कांदा, कोथिंबीर इत्यादीचे पीक घेतले जायचे. पण खराब हवामानामुळं या पिकांच उत्पन्न घेणंही कठीण होऊन बसलं होतं. यावर काहीतरी उपाय केला पाहिजे या हेतून ते पेटून उठले.

अपारंपारिक उर्जास्त्रोतांचा वापर

या गंभीर परिस्थीतीतून मार्ग काढण्यासाठी संबंधित विद्यूत विभागांकडून कोणतीच आशा न ठेवता. अभिनव प्रयत्नातून या परिस्थीतीवर मात करण्याचा निर्णय कदम यांनी घेतला. यासाठी त्यांच्या २६ वर्षाच्या अनुभवांची मदत झाली. त्यांनी गावात पवन चक्की उभा करण्याचा निर्णय घेतला. मे ते ऑक्टोंबरच्या दरम्यान हवेचं प्रमाण गावात चांगलं असत. आणि उरलेल्या महिन्यात उन्ह मोठ्या प्रमाणात असतं.

कदम यांनी अमेरिकेतील सहकारी मित्रांशी चर्चा केली. तज्ञांकडून सल्ले घेतले. औरंगाबाद आणि पुण्यातल्या इंजिनिअरींगच शिक्षण घेणाऱ्या युवकांना त्यांनी गावी बोलवून घेतल. त्यांना दहा दिवस प्रशिक्षण दिलं. आणि एका आठवड्याच्या आत त्यांनी पवन चक्की तयार केली. यासाठी त्यांना ३.५ लाखांचा खर्च आला. यानंतर काही आठवड्याच्या आतच त्यांनी २.५ लाख रुपये खर्चून सोलर पॅनल बनवले. वायु उर्जा आणि सौर्य ऊर्जेच्या माध्यमातून त्यांनी वीज प्रश्नावर कायमची मात केली

दोन्ही प्लांट्सना यशस्वीरित्या त्यांनी सुरु केलं. आज ते समाधानानं शेती करताहेत. शेतीमालावर प्रक्रिया करुन ते बाजारातही ते पाठवत असतात. याचा मोबदलाही त्यांना चांगला मिळतो. भारतात वायुउर्जा आणि सौर्य उर्जेचा वापर करुन शेतकरी त्यांचे प्रश्न सोडवू शकतात. अनावश्यक खर्च टाळल्यास अल्प दरात हे उर्जास्त्रोत ते वापरू शकतात. यामुळं शेतकऱ्यांच्या विकासासाठी ते सर्व ते प्रयत्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय.

इतर शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सोडली नोकरी

ग्रामीण उद्योग व्यावसायिकतेला बढावा देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी डिसेंबर २०२०ला नोकरी सोडत नवी इनिंग सुरु केली. लसून, मेथी, हळद, कोथिंबीर याची शेती कदम मोठ्याप्रमाणात करताहेत. या भाजीपाल्याला कच्च विकण्याऐवजी त्याला सुकवून प्रक्रिया करुन विकल्यास चांगले पैसे हातात राहत असल्याचं ही ते सांगतात.

अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर करुन गावाला आत्मनिर्भर बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी त्यांनी गावातल्या ४५० महिलांना स्वतः सारखी शेती करण्याचे प्रशिक्षण दिलंय. आता या महिलांकडून तयार झालेला माल कदम विकत घेताहेत. यातल्या ७० टक्के भाजीपाल्याला सुकवून प्रक्रिया करुन विकलं जातंय यामुळं आधीपेक्षा ४० टक्के नफा महिलांना होताना दिसतोय. आता गावात.मोठ्याप्रमाणात शेती उत्पन्न घेतलं जातंय. गावातला शेतकरी वर्ग आर्थिकरित्या स्वावलंबी होतोय. या मागे गीताराम कदम यांचा मोठा वाटा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER