नग्न फ़ोटो व्हायरल करण्याची धमकी देत दोघांनी केला तरुणीवर बलात्कार

दोघाँना अटक, ट्रॉम्बेतील घटना

rape

मुंबई : चेंबुर मधील सामूहीक बलात्कार प्रकरण ताज़े असताना तरुणीचे नग्न फ़ोटो व्हायरल करण्याची धमकी देत दुकलीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना गोवंडित घडली आहे. मंगलवारी हे प्रकरण समोर येताच ट्रॉम्बे पोलिसांनी अमजदअली मोहम्मदजमा खान ( 30),नूर मोहम्मद नजीर शेख ( ४२) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

ही बातमी पण वाचा : मुंबईत छम छम सुरूच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान हा पेंटर आहे तर शेख़ हा चालक म्हणून काम करतो. दोघेही गोवंडीतील म्हाडा कॉलोनीतील रहिवासी आहेत. तक़्रारदार तरुणीने त्यातिल एकाला मैत्रीतून तिचे नेकेड फोटो पाठविले होते. हे फ़ोटो व्हायरल करण्याची धमकी देत, या दुकलीने o६/०९/२०१९ रोजी १९:३० चे सुमारास शांती को हाऊसिंग सो. बी न १५ पहिला माळा रु.न. ११५, महाराष्ट्र नगर मानखुर्द मुंबई ८८ याठिकाणी बोलावून धेतले. तिथे दोघानी ही तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने याबाबत ट्रोम्बे पोलीस ठाणे गाठून तक़्रार दिली. तिच्या तक़्रारीवरुन गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोघाना मंगलवारी अटक केली आहे.

ही बातमी पण वाचा : बीडमध्ये एकविसाव्यांदा होणार महिला बाळांत