बरं झालं उद्धव ठाकरेंना भूमिपूजन सोहळ्याचं आमंत्रण मिळालं नाही, नाही तर… – गिरीश महाजन

girish-mahajan-on-uddhav-thackeray

मुंबई : अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं भूमिपूजन (Ram mandir bhoomipujan) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PMModi) यांच्या हस्ते पार पडलं. मागील काही दिवसांपासून अयोध्येत या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे राम मंदिर ट्रस्टने जाहीर केले. या पार्श्वभूमीवर राज्यात निमंत्रणावरून वादंग पेटले होते .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) आमंत्रण काही मिळाले नाही. यावरून भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. बरं झालं उद्धव ठाकरेंना भूमिपूजन सोहळ्याचं आमंत्रण मिळालं नाही. त्यांना जरी आमंत्रण मिळालं असतं तरी त्यांची फजिती झाली असती, असं बोलत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर नाराज झाली असती, असा टोला महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे .

दरम्यान, शेकडो वर्षांचे स्वप्न पूर्ण होते. अयोध्येतल्याच नाही तर जगभरातल्या रामभक्तांनी पाहिलेलं स्वप्न आज कित्येक वर्षांनंतर साकार होते, अशी भावना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानंतर गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER