मोगलाई काय? अमिताभ बच्चन, अक्षयकुमारचे शुटींग रोखून दाखवाच; गिरीश महाजनांचे काँग्रेसला आव्हान

नवी दिल्ली :- इंधन दरवाढीवरून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अक्षयकुमार (Akshay Kumar) यांनी ट्विट केले नाही तर त्यांचे शुटिंग रोखण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला होता. त्यावर भाजपाचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे – अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांचे चित्रीकरण रोखून दाखवाच. महाराष्ट्रात काय मोगलाई काय?;

प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी हे आव्हान दिले. ते म्हणालेत, पेट्रोल-डिझेलच्या मुद्दयावरून कोणीही राजकारण करू नये.

अधिवेशन होऊ नये म्हणून कोरोनाचा कांगावा

राज्यातील कोरोनाच्या स्थितीला राज्य सरकारच जबाबदार आहे. महाविकास आघाडीतील नेते जाहीर कार्यक्रम घेत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढतो आहे. राज्य सरकारला अधिवेशन होऊ द्यायचे नाही त्यामुळे हा कांगावा केला सुरू आहे, असा आरोप करतानाच महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकर झाली पाहिजे, असे महाजन म्हणालेत.

ही बातमी पण वाचा : राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली  आणा  ;  शिवसेनेची मोदी सरकारवर टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER