
जळगाव :- भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पुन्हा एकदा कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. खडसे यांना यापूर्वीही दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यावर ‘हा नेमका कोणत्या प्रकारचा कोरोना आहे, यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करावं’ अशी मागणीच गिरीश महाजन यांनी केली आहे. महाजन यांच्या अशा प्रकारच्या मागणीमुळे जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा खडसे विरुद्ध महाजन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. (Girish Mahajan criticizes Eknath Khadse)
राज्यात कोरोना आहे; पण आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकरचा कोरोना आहे. एका व्यक्तीला तीन-तीन वेळा त्याची लागण झाली होती. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा कोरोनाची लागण होत आहे. हा कोरोनाचा कोणता प्रकार आहे, याची चौकशी करावी, असं मी म्हणत नाही. पण या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे, असा टोला महाजन यांनी लगावला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला