आमच्याकडे ईडी आली तर खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळणार : गिरीश बापट

Girish Bapat

पुणे : रिक्षाचालकांना १ हजार ५०० रुपये अर्थसाहाय्य मिळाले पाहिजे, या मागणीसाठी खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी RTO कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. या आंदोलनात भाजपचे (BJP) कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी एक कार्यकर्ता म्हणाला की, बापटसाहेब, तुमच्यामागे ईडी बसला आहे. हे ऐकताच गिरीश बापट यांनी प्रत्युत्तर दिले आणि म्हणाले, “अशा ईडीफिडीना मी काय घाबरत नाही.आजवर असंख्य आंदोलने केली आहेत. आमच्याकडे ईडीला येऊन काय मिळणार आहे. आमच्या खिशात चणे, फुटाणे आणि शेंगदाणे मिळणार.

ईडी येऊ देत आणि जाऊ देत. आमच्यासाठी ईडी म्हणजे रिक्षाचालक आहे.” कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये अर्थसाहाय्य दिले जाणार आहे, अशी घोषणा राज्य सरकारमार्फत करण्यात आली. मात्र, अजूनही रिक्षाचालकांना अर्थसाहाय्य मिळाले नाही. पुण्यातील RTO कार्यालयाबाहेर खासदार गिरीश बापट यांनी आंदोलन केले. यावेळी शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.गिरीश बापट म्हणाले की, “कोरोना महामारीमुळे गेली एक महिन्याहून अधिक काळ रिक्षाचालकांचे उत्पन्नाचे साधन बंद झालेले आहे. यामुळे त्यांना रोजचा उदरनिर्वाह करण्याकरिता त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच काही रिक्षाचालकांच्या घरी वैद्यकीय अडचणीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच खालावली आहे. राज्य सरकारकडून महिनाभरापूर्वी एक पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये रिक्षाचालकांना १ हजार ५०० रुपये अर्थसाहाय्य मदत दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली. मात्र, कोणाच्याही खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. आम्ही RTO कार्यालयाच्या पायर्‍यांवर मूक आंदोलन करत आहोत, सरकारने या घटकाला लवकरात लवकर मदत द्यावी.” अशी मागणीदेखील बापट यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button