स्थलांतरित पक्ष्यांमुळे बर्ड फ्लू : केंद्राचा दावा

नवी दिल्ली :- परदेशातून भारतात आलेल्या पक्ष्यांमुळे (स्थलांतरित) बर्ड फ्लूचा (Bird flu) प्रादुर्भाव देशात झालेला आहे. सर्वाधिक पक्षी तेथेच मरण पावले आहेत, जेथे स्थलांतरित पक्ष्यांचे या काळात आगमन होते, असे केंद्रीय पशुपालनमंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांचे म्हणणे आहे.

अनेक राज्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. त्यामुळे देशभरात १० दिवसांत ४ लाख ८४ हजार ७७५ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात बर्ड फ्लूने ३ हजार स्थलांतरित पक्ष्यांचा बळी गेला आहे.

हिमाचल प्रदेशातील पौंग धरण परिसर अभयारण्यात आढळलेले मृत बार हेडेड गूज आणि अन्य पक्षी बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे समोर आले आहे. जालंधर, पालमपूर प्रयोगशाळांपाठोपाठ भोपाळ प्रयोगशाळेतही मृत पक्ष्यांच्या नमुन्यात एच ५ एन १ एव्हियन एन्फ्लू एंझा आढळलेला आहे. हरियाणात ४ लाखांहन जास्त कोंबड्या मरण अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री संजीव बालयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये बर्ड फ्लूला अधिकृत दुजोरा मिळालेला आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने दिल्लीत मध्यवर्ती कक्ष स्थापन केला असून, तो राज्यांच्या आजाराची लक्षणे, उपचार बर्ड फ्लूची लक्षणे सामान्य फ्लूसारखी असतात. श्वास घेण्यात त्रास, मळमळ होणे, ताप, सर्दी, स्नायू तसेच पोटाच्या खालच्या भागात दुखणे, डोकेदुखी ही लक्षणे आहेत.

कोंबड्यांच्या संपर्कात राहिल्याने माणसांमध्येही हा आजार फैलावू शकतो. याचा विषाणू (एव्हियन एन्फ्लूएंझा) डोळे, नाक आणि तोंडावाटून शरीरात प्रवेश करतो. स्वाईन फ्लूत दिले जाणारे औषधही यावर उपचार करते. त्यात बर्ड फ्लूचा हा विषाणू फार घातक नाही. लोकांनी फार घाबरू नये, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER