गिरिजाला मिळाले खास गिफ्ट !

Girija

कलाकारांना नेहमी त्यांच्या चाहत्यांकडून प्रेम हवं असतं. त्यांनी केलेल्या एखाद्या भूमिकेला चाहत्यांकडून मिळणारी दाद हा सगळ्यात मौल्यवान पुरस्कार असतो. चाहतेही त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या भूमिकेला दाद देत असतात. तसेच या कलाकारांना अनेक भेटवस्तूही पाठवत असतात; मग ते वाढदिवसाच्या निमित्ताने असो किंवा कोणतेही कारण नसतानादेखील. अशा अनेक भेटवस्तू कलाकारांना मिळत असतात. अशीच एक भेटवस्तू, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेतील नायिका गिरिजाला (Girija) मिळाली आहे.

या भेटवस्तूने तिला फक्त आनंद झालेला नाही तर तिला भारावूनदेखील टाकले आहे. काय आहे हे गिफ्ट? आणि त्यासोबत एक पत्रही आहे. या पत्रातून गिरिजाला घरी येण्याचे निमंत्रणही तिच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या चाहत्याने दिले आहे. भेटरूपात आलेले हे पत्र सोशल मीडिया पेजवर शेअर करत तिने तिचा आनंद व्यक्त केला आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेत गिरिजा ही गौरीची भूमिका साकारत आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच तिला अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना तिने वेगवेगळ्या जाहिराती आणि मॉडेलिंग, फॅशन शो केले होते. ‘श्रावण क्वीन’ या सौंदर्य स्पर्धेच्या मंचावर तिला श्रावण क्वीनचा मुकुट मिळाला आणि तिचा रुपेरी दुनियेत येण्याचा मार्ग काहीसा सुकर झाला. यापूर्वी तिने काही सिनेमातही काम केले आहे; मात्र ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेमुळे गिरिजा घराघरांत पोहचली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून सध्या ही मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे.

एकीकडे ज्याच्यावर गौरी मनापासून प्रेम करते त्या नायक जयदीपसोबत तिचे एका विचित्र परिस्थितीत लग्न झाले. खरं तर त्याच्या मनात ज्योतिका नावाची वेगळी मुलगी आहे. पण गौरीसोबत लग्न झाल्यामुळे तो एका वेगळ्याच पेचात पडलेला आहे. जयदीप व गौरी लहानपणापासूनचे मित्र असल्यामुळे ती त्याच्या पूर्वप्रेमाचा आदरही करते. परंतु त्याच वेळी जयदीप आपला होऊ शकत नाही याचं दुःखही तिच्या मनात असतं. अशा एका वेगळ्या वळणावर ही मालिका सध्या आल्याने चाहत्यांचेही लक्ष पुढे या मालिकेत काय होणार आणि त्यांच्या आवडत्या गौरी या व्यक्तिरेखेला कसा न्याय मिळणार अशी चर्चा या मालिकेच्या निमित्ताने गिरिजा फॅन क्लबमध्ये रंगत आहे.

ही बातमी पण वाचा : आजीच्या आठवणीने रसिका झाली भावूक

गिरिजा सांगते, गौरीच्या भूमिकेविषयी चाहते मेसेज आणि फोन करून सतत मला प्रोत्साहन देत असतात. शिवाय माझ्या सोशल मीडिया पेजवरदेखील अभिनयाला खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी माझ्या नावाने एक भेटवस्तू आली आणि मला सुरुवातीला उत्सुकता वाटली की, माझ्यासाठी कोणी गिफ्ट पाठवले असेल! मात्र गिफ्ट उघडून पाहिल्यानंतर त्यात माझं छान रेखाचित्र आणि त्यासोबत एक फोटो आणि त्यासोबत एक पत्र असं त्या बॉक्समध्ये होतं. माझा गौरीच्या लुकमधला पेंटिंग केलेला तो फोटो पाहून मला खूप आनंद झाला.

खरं तर चाहते आपल्यासाठी काय काय करतात हे बघून एक वेगळंच समाधान मिळालं. पण सगळ्यात जास्त मनाशी जोडले गेले होते ते या फोटोसोबत असलेले पत्र. ज्या चाहत्याने मला हे पत्र पाठवले आहे. त्यांनी त्यामध्ये असे लिहिले आहे की ,आमचं सगळं कुटुंब ही मालिका पाहते. एकत्र कुटुंबामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची जशी माणसं असतात, तशीच तुमच्या कुटुंबातही वेगळ्या स्वभावाची माणसे आहेत. पण नेहमी चांगलं वागणाऱ्या व्यक्तीचाच विजय होत असतो हा संदेश तुमच्या मालिकेमधून मिळाला आहे. आमच्या कुटुंबात माझी छोटी मुलगी आहे तिलादेखील या मालिकेच्या शीर्षक गीताची सवय झाली आहे. कार्तिकी गायकवाडने गायलेले या मालिकेचे शीर्षक गीत ऐकल्याशिवाय ती झोपत नाही.

इतकं आमचं कुटुंब तुमच्या मालिकेशी एकरूप झालं आहे. तुम्ही एकदा आमच्या घरी यावे, अशी आमची इच्छा आहे. खरोखरच आवडत्या कलाकाराला त्यांचे चाहते वेगवेगळे गिफ्ट देत असतात. अनेकदा या भेटवस्तू बाजारातून आणलेल्या असतात. परंतु गिरिजाला मिळालेली ही भेटवस्तू तिच्या चाहत्याने स्वतः तिचे पोस्टर बनवून दिली आहे. गिरिजाची ही पहिलीच मालिका आहे. अभिनयासोबत तिला डान्सची प्रचंड आवड आहे. जेव्हा मालिकेमध्ये शूटिंगच्या दरम्यान रिकामा वेळ मिळतो तेव्हा या सगळ्या कलाकारांची धमाल मस्ती सुरू असते.

तसेच अनेक मीन्स बनवत असतात. अशा ऑफस्क्रीन मजा करत कलाकार त्यांचा कंटाळा घालवत असतात. गिरिजा तिच्या डान्सचे व्हिडीओ सतत अपलोड करत असते. या मालिकेने गिरिजाला एक ओळख दिली आहे हे जितकं खरं आहे तितकंच या मालिकेत ती साकारत असलेल्या गौरी या व्यक्तिरेखेवर तिचे चाहते जिवापाड प्रेमसुद्धा करतात हेच तिला या खास भेटवस्तूने दाखवून दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER