‘जिंजर लेमन टी’

Ginger-and-Lemon-Tea

रोज सकाळी साधारण चहा पिऊन बोर झालेत?? तर चहाला द्या नवा फ्लेवर. बनवा ‘जिंजर लेमन टी’. जिंजर म्हणजे अदरक हे आरोग्यासाठी चांगले असते. या मध्ये असलेले जिंजेराॅल्स आणि अन्य न्यूट्रीएंट आपल्याला आजारापासून बचावतात. शिवाय जिंजर लेमन टी ने तुम्हाला फ्रेश ही वाटते. चला तर बनूया..

साहित्य :-  ginger-lemon-honey-tea

  • अडीच कप पाणी
  • २ टी बॅग्स
  • २ ते ३ चमचे मध
  • लिंबाच्या २ चकत्या
  • १/२ इंच आलं

कृती :- आल्याच्या पातळ चकत्या कराव्यात. पातेल्यात पाणी घेउन त्यात आल्याच्या चकत्या घालाव्यात व त्याला उकळून घ्यावे. कपमध्ये ओतून त्यात मध मिक्स करावा. कपात प्रत्येकी एक लिंबाची चकती आणि टी बॅग घालावी. चहा स्टीप झाला की टी बॅग काढून टाकावी. चमच्याने ढवळून कोमटसर चहा प्यावा.