केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट

- दिवाळीच्या तोंडावर महागाई भत्ता वाढवला

home

मुंबई :- दिवाळीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीत खरेदीचा जोर वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेऊन सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. या निर्णयामुळे शेअर बाजारात झळाळी आल्याचेही दिसले.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा चांगला परिणाम शेअर बाजारावरही झाला. मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) ६४५.९७ अंकांनी वधारून ३८ हजार १७७ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १८६.९० अंकांनी वधारून ११ हजार ३१३ अंकांवर स्थिरावला.

सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या हाती आता अधिक रक्कम येणार असल्याने दिवाळीय खरेदी व एकूणच कर्ज वितरणही वधारण्याची आशा आहे. यामुळे बँकिंग आणि ऑटो क्षेत्रात अधिक तेजी पाहायला मिळाली. इंडसलँड बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा स्टील यांच्या समभागांमध्ये ५.७२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.