Airtel चे ग्राहकांसाठी ‘गिफ्ट’, 6GB पर्यंत 4G डेटा निःशुल्क !

Airtel

दिल्ली : भारती एअरटेलने (Airtel) ग्राहकांसाठी 6 जीबीपर्यंत (6GB) ‘फ्री डेटा’ (Free Data) देणारी एक नवीन ऑफर आणली आहे. याआधी कंपनीने जुलै महिन्यात ‘फ्री डेटा कुपन’ (Free Data Coupon)ऑफर आणली होती. सुरुवातीला  219 रुपये, 249 रुपये, 279 रुपये, 298 रुपये, 349 रुपये, 398 रुपये, 399 रुपये, 449 रुपये, 558 रुपये, 598 रुपये आणि 698 रुपये प्रीपेड प्लॅन्ससाठी ही ऑफर होती. आता  ही ऑफर 289, 448 आणि 599 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनसाठीही असणार आहे. कंपनीने यातील 448 आणि 599 रुपयांचे दोन रिचार्ज प्लॅन गेल्या आठवड्यातच लाँच केले आहेत.  यामध्ये फ्री Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळते.

ऑफर फक्त ‘एअरटेल थँक्स अ‍ॅप’वरच

‘फ्री डेटा कुपन’अंतर्गत कंपनी ग्राहकांना 1 जीबी डेटाचे काही कूपन निःशुल्क देत आहे. काही प्लॅनसोबत असे दोन कुपन तर काही प्लॅनसोबत चार आणि सहा कुपन दिले जात आहेत. अशा प्रकारे ग्राहकांना जास्तीत जास्त 6 जीबी डेटा निःशुल्क मिळत आहे. 219 रुपये, 249 रुपये, 279 रुपये, 298 रुपये, 349 रुपये, 398 रुपये आणि 448 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसोबत दोन कुपन मिळत आहेत. प्रत्येक कुपनची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे. 399 रुपये, 449 रुपये आणि 558 रुपयांच्या प्लॅनसोबत चार कुपन दिले जात आहेत. याची व्हॅलिडिटी 56 दिवस आहे. याशिवाय 598 आणि 698 रुपयांच्या प्लॅनसोबत 6 कुपन मिळत आहेत. याची व्हॅलिडिटी 84 दिवस आहे. ‘एअरटेल थँक्स अ‍ॅप’ वापर करणाऱ्या ग्राहकांनाच या ऑफरचा लाभ मिळेल. या ऑफरव्यतिरिक्त एअरटेल Disney+ Hotstar VIP चे सबस्क्रिप्शन निःशुल्क देत आहे. नियमित प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त Disney+Hotstar VIP चे एका वर्षाचे सब्सक्रिप्शन 399 रुपयांत मिळते. एअरटेल काही प्रीपेड प्लॅन्समध्ये हे निःशुल्क देते आहे.

599 रुपयांचा प्लॅन

599 रुपयांच्या या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याशिवाय दररोज 2 जीबी डाटा आणि रोज 100 एसएमएस मिळतील. एअरटेल थँक्स आणि निःशुल्क Disney+Hotstar VIP सब्सक्रिप्शन मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवस आहे.

448 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनमध्येही सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसोबत रोज 100 SMS मिळतील. एअरटेल थँक्स आणि निःशुल्क Disney+Hotstar VIP सब्सक्रिप्शन मिळेल. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवस आहे.

499 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्लॅनमध्येही 448 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच सर्व सेवा मिळतात. पण हा प्लॅन फक्त पहिल्यांदा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे.

2,698 रुपयांचा प्लॅन

एअरटेलकडे Disney+ Hotstar VIP सब्स्क्रिप्शन देणारा 2,698 रुपयांचा रिचार्ज प्लॅनही आहे. यामध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह म्हणजेच एक वर्षासाठी दररोज 2जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंगचा आणि रोज 100 एसएमएसही मिळतात. याशिवाय कंपनीने 401 रुपयांच्या Disney+ Hotstar VIP प्लॅनमध्येही बदल केला आहे. 401 रुपयांच्या या प्लॅनमध्ये आता कंपनी आधीपेक्षा 10 पट जास्त डेटा देत आहे. कंपनी या प्लॅनमध्ये आता 3GB डेटाऐवजी 30 जीबी डेटा देत आहे. 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये निःशुल्क व्हॉइस कॉलिंग किंवा एसएमएसची सेवा मिळत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER