कोल्हापुरी गुळाला जीआय मानांकन

कोल्हापुरी गुळ

कोल्हापूर : कोल्हापुरी गुळाचे (Kolhapuri Jaggery) उत्पादन दिवसेंदिवस कमी होत असतानाच आता पणन गुळासह २४ पिकांना जीआय नामांकनाची अंमलबजावणी होणार आहे. प्रशिक्षण, अनुदानासह पणनच्या विविध योजनांचा लाभ घेण्याची गरज आहे. जीआय नामांकन मिळाल्याने साखरमिश्रीत गुळ, गुळातील भेसळ, कोल्हापुरी गुळाच्या नावाने होणारी फसवणूक बंद होण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरी गूळ म्हणून चार वर्षांपूर्वी मानांकन मिळाले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने कर्नाटक, सांगली येथील गुळाची कोल्हापूरी गूळ या नावाने विक्री होत आहे. त्यामुळे येथील गुळाचा दर घसरत होता. आर्थिक गणित कोलमडल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळ घरांची संख्याही झपाट्याने कमी झाली. गुजरातसह उत्तर भारतात कोल्हापुरी गुळाला मोठी मागणी आहे. त्यामुळेच भेसळ होत असल्याने कोल्हापुरी गुळाची बदनामी होत आहे. यासाठी पणन मंडळाने आता मानांकन प्राप्त शेती उत्पादनाच्या मार्केटिंगकडे लक्ष केंद्रित केले आहे. गूळ उत्पादक शेतकऱ्यांना पणनकडे नोंदणी केल्यानंतर संबंधितांचे प्रशिक्षण घेतले जाते. त्याचा मोबदलाही दिला जाणार आहे. विक्री स्टॉलसाठी आर्थिक मदत पणन करणार आहे. कोल्हापुरी गुळ, सांगलीतील बेदाणा, सातारा कोरेगाव येथील वाध्या घेवडा आणि महावळेश्वराची स्ट्रॉबेरी आदी २४ कृषी जीआय नामांकन प्राप्त कृषी उत्पादनासाठी २७ संस्था काम करत आहेत. यामाध्यमातून प्रशिक्षणासाठी दहा हजार रुपये अनुदान, प्रोत्साहन योजना, विक्री स्टॉल्ससाठी अर्थसहाय्य योजना सुरू केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER