मोदींचे कौतुक केले; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाळला पक्षाच्या ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा पुतळा

नवी दिल्ली : राज्यसभेचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Modi) कौतुक केल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध निदर्शन करून मंगळवारी जम्मूत त्यांचा पुतळा जाळला.

गुलाम नबी आझाद पक्षाविरुद्ध कारवाया करत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. त्यांच्याविरोधात आणि सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यात.

जम्मूमध्ये एका सभेत आझाद म्हणाले होते की, मला अनेक नेत्यांच्या अनेक गोष्टी आवडतात. मी स्वतः एका खेड्यातून आलो आहे. मला याचा अभिमान वाटतो. आपले पंतप्रधानही सांगतात, की ते ही एका गावातूनच आले आहेत. काहीच नव्हते, भांडी घासत होते, चहा विकत होते. आमचे राजकीय मतभेद आहेत. मात्र, किमान जे आपले वास्तव आहे, ते लपवत नाहीत. जे लोक आपले वास्तव लपवतात. ते खोट्या विश्वात राहतात. व्यक्तीला अभिमान असायला हवा. यावरून काँग्रेसचे कार्यकर्ते बिथरलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER