घटस्फोटीत व्यक्तीवर प्रेम करण्याचे फायदे..

divorce

प्रेमाला वयाचे बंधन नसते. म्हणून बरेचदा आपण प्रेमासाठी समवयस्क किंवा आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीची निवड करतो. त्यातच ती व्यक्ती अविवाहित असावी अशी आपली अट असते. या नुसार मघ आपण त्या व्यक्तीला प्रेम करतो आणि पुढे लग्न ही करतो. मात्र काही काळानंतर काही कारणास्तव दोघांत वादाला सुरुवात होते आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. मघ नात्याचा अंत म्हणून घटस्फोट हा एकच पर्याय उरतो. अशे व्यक्ती मनाने खचून जातात. पण कालांतराने हेच व्यक्ती आपल्या अनुभवातून मॅच्यूअर आणि तितकेच संवेदनशील बनतात. परंतु अश्या व्यक्तींसोबत जवळीक निर्माण करण्यासाठी हिम्मत असावी लागते. एका अभ्यासात असे आढळले आहे की, जर एखाद्या मॅच्यूअर किंवा त्यातच घटस्फोटीत व्यक्तीवर प्रेम केले तर मिळणारे फायदे हे चकित करणारे असतात. घटस्फोटित व्यक्तीच्या प्रेमात पडण्यात काही गैर नाही. किंबहुना एका जबाबदार व संबंधांची जाण असलेल्या व्यक्तीशी तुम्ही जवळीक साधता.

आपल्या पूर्वीच्या अनुभवातून ही व्यक्ती अनेक गोष्टी शिकलेली असते. यामुळे अशा व्यक्ती खुल्या विचारांच्या व समजुतदार असतात. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची किंवा हक्क गाजवण्याची गरज नसते. दु:ख, वेदना यांच्यासह या व्यक्तीकडे अनुभवातून आलेले शहाणपण असते. अशी व्यक्ती अधिक परिपक्व असते. आयुष्यातील कटू अनुभवांचा सामना करूनही जर या व्यक्तीचा दृष्टीकोन सकारात्मक असेल, तर असा जोडीदार नक्कीच तुमच्यासोबत आयुष्य घालवण्यासाठी योग्य आहे.

अशा लोकांसोबत नाते निर्माण करण्यासाठी तुम्हाला घाई करण्याची गरज नसते. त्यांना पूर्वी आलेल्या कटू अनुभवामुळे ते प्रथम तुम्हाला जाणून घेण्यासाठी वेळ घेतील. त्यानंतरच ते निर्णय घेतील. ते प्रथम निर्णयाच्या वास्तविक परिणामांचा विचार करतील, नंतरच कोणतेही वचन देतील. एकदा वचन दिल्यावर ते आपल्या निर्णयावर ठाम राहतील. त्यांचा हा निर्णय अर्थातच विचारपूर्वक घेतलेला निर्णय असेल. जर तुम्ही अश्या व्यक्तीच्या प्रेमात आहात तर एकदा त्यांना समजून नंतरच समोरचा निर्णय करावा. शिवाय तुमच्या घरच्यांचे मत ही तेवढेच म्हत्वाचे आहे.