घरगुती ‘लिपस्टीक’ ने खुलवा ओठांचे सौंदर्य

Lipstick

कुठलाही मेकअप ओठांना रंग चढल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यासाठी मग लिपस्टिक हा दैनंदिन मेकअपचा भाग झाला आहे. शिवाय मार्केटमध्ये महागड्या लिपस्टिकची तर रांगच लावलेली असते. कित्येकदा आपण ते विकत घेऊन तर आणतो, पण आपल्या ओठांवर त्याच विपरित परिणाम होऊ शकतो. ओठ हा आपल्या शरीराचा असा भाग आहे ज्याची त्वचा सर्वात जास्त पातळ आणि नाजूक असून शरीराच्या इतर भागांपेक्षा ओठांवर मॉइश्चर कमी असते. यावर रोज बाजारातील लिपस्टिक लावली तर ओठ काळे पडू लागतात. असे होऊ नये म्हणून तुम्ही घरी बनवलेली लिपस्टिक वापरू शकता. हे कस बनवा येईल बघा…

लिपस्टिक साठी साहित्य :-

  • एक बीट
  • 1/2 चमचा कोकोनट ऑइल
  • 1/2 चमचा मधमाश्यांचे मेण
  • 1/2 चमचा कोको बटर

बनवण्याची पद्धत :- बिटाचे पातळ काप करून वाळू द्या. डिहायड्रेटरमध्ये हे काप 120 डिग्रीवर 8 तास ठेवून वाळूव शकता. नंतर मिक्सरमधून वाटून पावडर तयार करा. मंद आचेवर एका भांड्यात अर्धा ते 1 कप पाणी टाकून त्यात मेण, कोको बटर, कोकोनट ऑइल आणि बीट पावडर मिसळा, चांगले ढवळा. गडद रंगासाठी अधिक पावडर किंवा वाळलेल्या चेरीज वापरू शकता. घट्ट झाल्यावर मऊ कपड्याने गाळून घ्या. लिप कंटेनरमध्ये हे मिश्रण ओतून घ्या आणि थंड होऊ द्या. आपले लिपस्टिक तयार झाले. हे पूर्ण पणे नैसर्गिक असल्यामुळे ओठ काळे पडणार नाही.