घंटागाडी कामगारांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

Flood

ठाणे (प्रतिनिधी):- वेळेवर वेतन नाही, कामाची शाश्वती नाही, अशा अडचणीमध्ये पिचलेल्या ठाणे, मुंबईसह अन्य भागातील कंत्राटी कामगार आणि घंटागाडी कामगारांनी एकत्र येत सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील पूरग्रस्तांना त्यांनी गरजेच्या वस्तूंचा पुरवठा केला आहे.

सांगली जिल्ह्यात  महापुराने थैमान घातले होते. यामुळे येथील घरेदारे, गुरेढोरे, सारा संसार वाहून गेला. होत्याचे नव्हते झाले. या पूरग्रस्तांना महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने ’एक हात मदतीचा’ दिला आहे. याद्वारे सांगली जिल्ह्यातील पळूस, वाळवा, शिराळा या तालुक्यांतील  पूरग्रस्तांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन मदत करण्यात आली. यासाठी युनियनचे कार्यकर्ते महेंद्र हिवराळे, प्रकाश बुबेरा, प्रदीप पाटील, महेंद्र खरात, विजय नगराळे, चंद्रशेखर दहिलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : आशा व गटप्रवर्तकांचा 4 सप्टेंबर पासून कामावर बहिष्कार