‘घामोळ्यांंसाठी’ आयुर्वेदिक उपाय

'घामोळ्यांंसाठी' आयुर्वेदिक उपाय - Ayurvedic remedies for 'wobbly'
Young beautiful woman scratching her self.

उन्हाळ्यात घाम येण्याच प्रमाण वाढणे साहजिकच आहे. उष्ण दमट हवेमुळे त्वचेतून घामाच्या ग्रंथींत मृतपेशी अडकून घाम बाहेर येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. मग शरीराच्या बाहेर फेकलेल्या घामाचे बिंदू पुन्हा त्वचेच्या आत गेल्याने त्या ग्रंथींना सूज येऊन घामोळे येतात. या शिवाय पिंपल्स, रॅशेस सुद्धा येतात. यावर योग्यवेळी आयुर्वेदिक उपाय केल्यास त्वचेवरील घामोळ्या किंवा त्वचेवरील अन्य त्रास देखील कमी होऊ शकतो.

कडूलिंब:- कडूलिंबाच्या पानांची पेस्ट घामोळ्यांचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते. कडूलिंबाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात. सोबतच ते अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दाह आणि खाज कमी करण्यासाठी मदत करते. घामोळ्यांवर कडूलिंबाच्या पानांची पेस्ट लावा कालांतराने हात स्वच्छ करा.

चंदन:- चंदन आणि गुलाबपाणी हे दोन्ही थंड स्वरूपाचं असल्याने शरीरात नैसर्गिकरित्या थंडावा निर्माण होण्यास मदत होते. या पेस्टमुळे उन्हाळयातील घामोळ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते. चंदन आणि गुलाबपाण्याला सुगंध असल्याने घामामुळे येणारा वासही कमी होतो.

कोरफड :- कोरफड आणि काकडी हे नैसर्गिकरित्या थंडगार असतात. त्यामुळे उन्हाळ्यातील घामोळ्याचा त्रास कमी करण्यासाठी कोरफड  आणि काकडीची पेस्ट करा. हे मिश्रण त्वचेवर लावल्यास खाज येण्याची समस्या कामी होते. २० मिनिटांनी हे मिश्रण साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. या सोबत घामोळे टाळण्यासाठी शारिरिक स्वच्छता राखणेही गरजेचे असते. उष्ण व दमट वातावरणात सैल आणि सुती कपडे घालण्याचा आई-आजीचा सल्ला मानायला हरकत नाही.