आरोपीसारखी वागणूक मिळते; मनसुख हिरेन यांनी लिहिले होते मुख्यमंत्र्यांना पत्र

Gets treated like an accused; Mansukh Hiren had written a letter to the Chief Minister

मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीचे मालक हिरेन मनसुख (Mansukh Hiren) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मनसुख यांनी 2 मार्चला पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली होती की, या प्रकरणी मी पीडित असूनही मला आरोपीसारखी वागणूक मिळते आहे.

चोरीप्रकरणी तेच तेच प्रश्न विचारुन वेगवेगळ्या तपास यंत्रणा माझा मानसिक छळ करत आहेत. पीडित असूनही चौकशीत आरोपीसारखी वागणूक देतात. माध्यम प्रतिनिधींही फोन करून विनाकारण मानसिक छळ करतात. कार चोरणाऱ्या गुन्हेगाराबाबत मला माहिती नाही तरीही माझा छळ सुरू आहे. कार चोरीला गेल्याबद्दल जबाब दिला, तरी छळ सुरू आहे, असे मनसुख यांनी पत्रात म्हणाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER